रावेर (प्रतिनिधी) बैल चोरीच्या प्रकरणात आमचे नाव का सांगितले म्हणत अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्या खिशातील 50 हजारांची रोकड हिसकावण्यात आल्याची घटना रसलपूर येथे सोमवार, 21 रोजी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी पाच संशयितांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेख ईद्रीस शेख सादीक (17, रसलपूर, ता.रावेर) या तरुणाच्या तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीला तू बैल चोरी प्रकरणात आमचे नाव का सांगितले म्हणत जाब विचारत लोखंडी पाईप व काठीने बेदम मारहाण केली तसेच खिशातील 50 हजारांची रोकड हिसकावत पळ काढला. याप्रकरणी शेख कलीम शेख सलाउद्दीन उर्फ कल्लू पहेलवान, शेख युसूफ शेख अलमुद्दीन, शेख अनिस शेख अलीमुद्दीन, शेख अलीम शेख सलाउद्दीन, शेख अजीज शेख कलीम (सर्व रा.रसलपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक् सचिन नवले करीत आहेत.