जळगाव (प्रतिनिधी) शिरसोली येथील एक महीन्याच्या बाळाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून दिल्याबद्दल कुटुंबाने पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
शिरसोली येथील युहान हरिष चित्ते या एक महिन्याच्या बाळाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजारची मदत मिळाली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयात येऊन आई वडीलांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडे मदत मागितली होती. यानंतर पालकांना ५० हजारची मदत मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंगेश चिवटे आणि जळगाव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव टिमचे पालकांनी मनापासून आभार मानलेआहेत.