नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागच्या २४ तासात देशात ५५ हजार ८३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ७७ लाख सहा हजार ९४६ जणांना करोनाची बाधा झाली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत देशात १ लाख १६ हजार ६१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या करोनाच्या सात लाख १५ हजार ८१२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ६८ लाख ७४ हजार ५१८ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मागच्या २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना हॉस्पिटमधून डिस्चार्ज मिळाला आहे. बुधवारी देशात ५४ हजार ४० नवे करोना रुग्ण आढळले होते, तर ७१७ मृत्यूंची नोंद झाली होती.