मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत (Mumbai) एका २५ वर्षीय युवकानं घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी एकटं असल्याचं पाहून तिच्यावर डाव साधला आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून (Lure of chocolate) तिच्यावर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी २५ वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुंबईतील एकाच परिसरातील रहिवासी आहेत. पीडित मुलीचे वडील मासेमारी करतात त्यामुळे ते फार कमी वेळा घरी असतात. तर पीडितेची आई देखील घरकाम करते. त्यामुळे बहुतांशी वेळी पीडित मुलगी घरी एकटी राहते. नराधम आरोपी हा बेरोजगार असून तो काहीच काम करत नाही. दरम्यान, ६ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटी असल्याचं आरोपीनं हेरलं होतं. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपीनं १ मार्च रोजी पीडित चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून स्वतःच्या घरी घेऊन गेला. याठिकाणी त्यानं पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशाच प्रकारे आरोपीने सलग पाच दिवस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
दरम्यान पीडित मुलीच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्यानं तिने याची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडितेच्या आईनं मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईनं मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्ह दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.















