जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या परिमंडल कार्यालयात एक मे रोजी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणसाठी उत्कृष्ठ ग्राहकसेवा देणाऱ्या यंञचालक आणि तंञज्ञ संवर्गातील ६२ उत्कृष्ठ वीज कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपञ देवून गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. ६३ कर्मचाऱ्यांत जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बुधवारी सकाळी झालेल्या या समारंभास मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्यासह अधीक्षक अभियंता अनिल महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे वित्त व लेखा विभागाचे गणेश लिथूरे व इतर सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत कामगार सन्मान समारंभात अध्यक्ष असलेले मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी महावितरण परिवारातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मोठी जवळीक साधली. गुणवंत कामगारांच्या निवड यादीत एकाही तांञिक महिला कर्मचाऱ्यांची निवड झाली नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी प्रचंड अस्वस्थता दाखवित कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या रुपाली तायडे या महिला कर्मचाऱ्यास त्यांच्या विशेष अधिकारात गुणवंत कामगारासाठीचा पुरस्कार देवून त्यांना सन्मानीत केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महावितरणचे कर्मचारी अगदी ग्रामीण आणि आदीवाशी भागात आपला जीव धोक्यात टाकून कशा ग्राहकसेवा देतात याची माहिती दिली. ग्राहकसेवा देणाऱ्यांप्रति ते भावूक होऊन तशा कर्मचाऱ्यांना त्यांनी अक्षरश: सॅल्युटच ठोकला. कर्मचारी म्हणून स्वत:चे, कुटुबांचे आणि महावितरणच्या अस्तित्वासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ग्राहकसेवेत झोकून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सन्मानित करण्यात आलेल्या यंञचालकांत जळगाव जिल्ह्यातून रुपाली तायडे यांच्यासह मोहम्मद गयास अब्दूल सत्तार कुरेशी, नरेंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, सुरेश गुरचळ, सागर चव्हाण, दिलीप बुरुजवाले, विरेंद्रसिंग पाटील, धुळे जिल्ह्यातून दिलीप बेहरे, वसंत पाटील, यशवंत ओतारी तर नंदूरबार जिल्ह्यातून अनिल पवार, बापु चौधरी यांचा समावेश आहे.
तंञज्ञ व प्रधान तंञज्ञ संवर्गातून कौस्तुभ भांरबे, एकनाथ खामणकर, मुकेश कोल्हे, आलमगीर पटेल, भाऊसाहेब सुर्यवंशी, योगेश रावते, विठ्ठल राठोड, मनोज धनगर, राजेंद्र सोनवणे, राहूल मराठे, आकाश वाडीले, भूषण पाटील, मनोज मराठे, सुरेश नेरकर, योगेश गोराडे, निवृत्ती पाटील, संदीप पाटील, सागर पाटील, विशाल सोनवणे, संतोष कपले, दिपक पाटील, किशोर पाटील, अमित बेंडाळे, पवन पाटील, भूषण बेंडाळे, अमजद तडवी, लोकेश धनगर, दिलीप गावीत, सचिन पालवे, गोरखनाथ पाटील धुळे जिल्ह्यातून अजय वारकर, स्वप्नील ठाकूर, सुरेश थैल, छोटू ठाकरे, रविंद्र नेरपगार, गिरीष देसले, विकास पगारे, अनिल माळी, जयेश पवार, राकेश धनगर, योगेश लांडगे आणि नंदूरबार जिल्ह्यातून गुजऱ्या पावरा, छोटीराम गावीत, प्रतिक पाटील, निलेश खैरनार भरत भिल, नरसिंग पावरा, अशोक वळवी, संदीप पावरा व कल्पेश सुर्यवंशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन सहायक अभियंता श्रीमती रत्ना पाटील यांनी केले.