नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या चोवीस तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ६७,७०८ रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७३,०७,०९८ वर पोहोचली आहे. देशात सध्या ८,१२,३९० करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून तो रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तसेच आजवर ६३,८३,४४२ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १,११,२६६ करोनाबाधित रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.