TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : एरंडोल प्रांताधिकार्‍यांना गळा आवळून ठार मारण्याचा वाळू माफियांकडून प्रयत्न !

महसूल पथकावर दगडफेक ; वाळू तस्करांविरोधात कासोदा पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2024
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोलचे प्रांताधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाळू माफियांनी एरंडोल प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा गळा आवळण्याचा प्रयत्नही केला शिवाय महसूल पथकावर हल्ला करीत त्यांच्यावर दगडफेक केल्याची बाब शुक्रवारी रात्री घडल्याने जिल्ह्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी महसूल कर्मचार्‍यांमधून होत आहे.

सुरूवातीला हात-पाय तोडण्याची धमकी
एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह.शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे आपल्या महसूल पथकासह शुक्रवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेल्यानंतर ख्वाजा मिया दर्ग्याजवळ दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले. पथकाला पाहताच यातील दहा ट्रॅक्टर चालकांनी परधाडे गावाच्या दिशेने धूम ठोकली मात्र दोन ट्रॅक्टर्स तेथेच असल्याने महसूल पथक कारवाई करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. याप्रसंगी चार ते पाच संशयितांनी महसूल पथकाशी हुज्जत घालत ट्रॅक्टर नेल्यास हात-पाय तोडू, अशी धमकी दिली. यावेळी प्रांताधिकार्‍यांनी स्वतःची ओळख देत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी आल्याचे सांगितले मात्र यावेळी संशयितांनी आपल्या अन्य साथीदारांना बोलावले.

READ ALSO

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

प्रांताधिकार्‍यांचा आवळला गळा
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, भालगाव मंडळाधिकारी दीपक ठोंबरे, उत्राण तलाठी शकील अहमद शेख, तलाठी विश्वंभर बाळकृष्ण शिरसाठ आदी कारवाई करीत असताना वाळॅू माफियांनी त्यांच्यावर हल्ला चढवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. संशयितांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांना गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तर महसूल पथकाने संशयितांना बाजूला सारत प्रांताधिकार्‍यांची सुटका केली. आरोपींपासून जीव वाचवण्यासाठी पथक नदीच्या बाहेर जीव मुठीत घेवून पळत असताना वाळू माफियांनी जोरदार दगडफेक केली. संशयितांनी त्यानंतर दोन ट्रॅक्टर नदीतून पळवून नेले. यावेळी उत्राण पोलिस पाटील प्रदीप तिवारी यांनी संशयित आकाश राजेंद्र पाटील यास ओळखले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी (57) यांनी कासोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आकाश राजेंद्र पाटील, अमोल (पूर्ण नाव माहित नाही), राहुल (पूर्ण नाव माहित नाही), दादाभाऊ (पूर्ण नाव माहित नाही) आणि सागर (पूर्ण नाव माहित नाही) व अनोळखी जमाविरोधात भाग 5, गुरनं.01/2024 भादंवि कलम 353, 307, 143, 332, 379, 323, 504, 506, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1999- 48 (7) व 48 (8) व खाण आणि खनिज अधिनियम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
Next Post

नाशिक परीक्षेत्रातील 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ; जिल्ह्यातील आठ निरीक्षकांचा समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव देवकरांचं नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं, याचा मला खेद वाटतो ; अनिल पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

March 15, 2022

वैभव मावळे यांना नाट्यशास्त्रात पीएच.डी प्रदान

August 4, 2025

आपल्या पतीचा कुणी तरी खूनच केलाय ; जामनेर पोलिसात पत्नीची तक्रार ! 

July 2, 2022

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनला रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group