TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडिलांसह लहान भावाचा खून, तरुणाला जन्मठेप ; जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल !

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गावात नेहमी भांडण करतो म्हणून वडीलकीच्या नात्याने वडीलांसह लहान भावाने मोठ्या मुलाच्या चापटा मारल्या. त्याचा राग मनात धरुन बसलेल्या मोठ्या मुलाने निलेश आनंदा पाटील (रा. नांद्रा. ता. जामनेर) याने वडीलांचे तोंड दाबून चाकूने वार केले. याचवेळी वडीलांना वाचविण्यासाठी आलेल्या लहान भावाला देखील चाकूने भोसकून दुहेरी खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने मारेकरी निलेश पाटील याला दोषी ठरवित त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

हातातील चाकूने भोसकून केला खून !
जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात आनंदा कडू पाटील हे वास्तव्यास होते. त्यांचा मोठा मुलगा निलेश हा ट्रॅव्हल्सवर चालक होता तर लहान मुलगा महेंद्र हा चटई कंपनीत कामाला होता. दि. ११ जुलै २०२० रोजी महेंद्र हा पत्नीसह आपल्या गावी मुक्कामी गेला होता. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ निलेश याने घराजवळ राहणाऱ्या पांडुरंग सोनवणे यांच्यासोबत वाद घातला. यावेळी लहान भाऊ महेंद्र याने मोठ्या भाऊ निलेश याला समजावून घरी आणले. त्यानंतर वडीलकीच्या नात्याने निलेश याला गावात नेहमी भांडण करतो म्हणत वडीलांसह लहान भावाने दोन-चार चापटा मारल्या त्यानंतर सर्वजण झोपून गेले होते. दरम्यान, आनंदा पाटील हे पत्नीसह घराच्या बाहेर ओसरीवर खाट टाकून झोपलेले असतांना निलेश याने त्याच्या वडीलांचे तोंड दाबून हातातील चाकूने भोसकून खून केला. हे बघून त्याच्या आईने ओरडून भैय्या पळ असा आवाज दिला. तो आवाज ऐकून महेंद्र हा पत्नीसह खोली बाहेर आला असता, त्याच्या भावाने वडीलांचे तोंड दाबले होते आणि त्यांच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे दिसले.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

रक्ताने माखलेला चाकून घेवून गेला पोलीस पाटलाच्या घरी
वडीलांसह लहान भावाचा खून केल्यानंतर मारेकरी निलेश हा हातात रक्ताने माखलेला चाकू घेवून पोलीस पाटील यांच्याघरी गेला. त्याने मी माझ्या बापाचा आणि भावाचा खून केला असून तुम्ही घराकडे चला असे त्याने सांगितले. यावेळी पोलस पाटील यांनी घटनेची खात्री केली. दरम्यान, मारेकरी निलेश हा गावातील लोकांना माझ्याजवळ येवू नका तुम्हाला मारुन टाकीन अशी धमकी देखील देत होता.

अन् मोठ्या भावाच्या हातून झाला लहान भावाचा खून !
मारेकरी निलेश पाटील हा ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून कामाला होता, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे याची त्याची नोकरी सुटली होती. तर त्याचा लहान भाऊ याला देखील सुट्टी असल्याने तो पत्नीसह गावी गेला होता. घटनेच्या दिवशी हा गावी गेलेला असल्याने दुर्देवाने मोठया भावाकडून रागाच्या भरात लहान भावाचा खून झाला होता.

आईने केली घटना कथन !
प्रत्यक्षसाक्षीदार असलेल्या सरस्वतीबाई यांनी घडलेली घटना जशीच्या तशी न्यायालयासमोर सांगितली. एकीकडे पतीः आणि लहान मुलाचा खून झालेला होता, तर दुसरीकडे मोठा मुलगा हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता, अशी द्विधा मनस्थिती असतांना सरस्वतीबाई यांनी साक्ष दिली. त्यांच्यासह पोलीस पाटील योगेश बेलदार, दिनेश कुऱ्हाडे, अरुण शिंदे, मयताची पत्नी अश्विनी पाटील, प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तपासधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांच्या साक्ष महत्वपुर्ण ठरल्या.

वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या भावाला भोसकले !
वडीलांना वाचविण्यासाठी महेंद्र हा गेला असता, मारेकरी निलेश याने त्याच्या हातातील चाकू लहान भावाच्या पोटात खूपसून त्याचा देखील खून केला. यावेळी तो वहीनीच्या देखील अंगावर धावून गेला. मात्र त्यांनी पळत जावून घराचा दरवाजा बंद केल्याने त्या बालंबाल बचावल्या होत्या. यापकरणी महेंद्र याची पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पहुर पोलीसात दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता

पुराव्यांसह प्रभावी युक्तीवादामुळे ठरवले दोषी !
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या न्यायालयात चालला. यावेळी एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये घटनास्थळावरील पुराव्यांसह प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरीत मारेकरी निलेश पाटील याला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी काम काज पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यास मनसेचे नेते जळगाव येथे उपस्थित राहणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कवी संमेलन

December 5, 2021

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार : महापौर जयश्री महाजन

March 26, 2022

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group