इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने आपल्याच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pakistani man killed 7 days old daughter) व्यक्तीला मुलाची अपेक्षा होती. त्याच रागात बापाने स्वत:च्या 7 दिवसांच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाकिस्तान पोलिसांनी पंजाब प्रांतातील मियावली शहरातून शाहजेब खान नावाच्या व्यक्तीला अटक केलं आहे. त्याने 7 मार्च रोजी स्वत:च्या 7 दिवसांच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. मात्र यामागील कारण ऐकून कोणाचाही संताप होईल.
वडिलांनी नवजात मुलीला गोळ्या घातल्या
व्यक्तीला मुलाची अपेक्षा होती. त्याच रागात बापाने मुलीची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मामांनी सांगितलं की, जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील खूप रागात होते. पोस्ट-मार्टेम रिपोर्टनुसार, त्याने मुलीवर 5 गोळ्या झाडल्या होत्या, यात तिचा जागीच मृत्यू झाला.















