TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 70 कोटीची कामे मंजूर !

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 70 कोटीची कामे मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील वाड्या, वस्त्या, गावांना रस्ते बांधून देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या व दुरवस्था झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 75 किमीच्या रस्त्यांसाठी 66 कोटी 86 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी असा एकूण सुमारे 70 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे.

ना. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन यांचे आभार मानले आहेत.‎ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या समितीमार्फत रस्तेबांधणी आणि दर्जोन्नतीसाठी गावांची निवड केली जाते तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन करणे, अतिक्रमणे हटविणे व इतर अडचणी दूर करुन समन्वय साधण्याची जबाबदारी असते.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे अशी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात धरणगाव विवरे ते भवरखेडा रस्ता धरणगाव – विवरे – भवरखेडा ते तालुका हद्द ग्रा.मा. 4, 46, 64 व इजिमा 55 रस्ता – (12 किमी – 9 कोटी 46 लक्ष 84 हजार), झुरखेडा- खपाट ते पिंपळेसीम ग्रा. मा. 16, 78 रस्ता ( 5 किमी – 3 कोटी 77 लक्ष 69 हजार), चावलखेडा ते पष्टाणे ग्रामीण मार्ग 19 , इजिमा 58 , 52 रस्ता (6 किमी- 4 कोटी 42 लक्ष 33हजार), विवरे – जांभोरा – सारवे खुर्द ते बिलखेडा ग्रा.मा. 29, 66 , 58 रस्ता ( 10 किमी – 08 कोटी 21 लक्ष 35 हजार ) अश्या 4 रस्त्यांच्या 33 किमी रस्त्यांसाठी 25 कोटी 88 लक्ष 21 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जळगाव तालुक्यातील डोमगाव – पाथरी ते तालुका हद्द ग्रा.मा. 45 रस्ता ( किमी 7.80 – 6 कोटी 9 लक्ष 21 हजार), भोकर – पडसोद – जामोद – आमोदे ते गाढोदा इजिमा 44 रस्ता ( 12 किमी – 10 कोटी 53 लक्ष 96 हजार), आसोदा ते भोलाणे ग्रा.मा. 105, इजिमा 08 रस्ता (6.30 किमी 6 कोटी 83 लक्ष 83 हजार ), खेडी ते ममुराबादइजिमा 88 रस्ता ( 5.73 किमी – 6 कोटी 51 लक्ष 73 हजार), कानळदा ते रिधुर ग्रा.म. 39 रस्ता (5.45 किमी- 5 कोटी 71 लक्ष 64 हजार) , तसेच प्रजिमा 39 ते शिरसोली रस्ता तालुका हद्द दहीगाव रस्ता ( 5 किमी – 5 कोटी 28 लक्ष 12 हजार) अश्या 6 रस्त्यांच्या 42 किमी रस्त्यांसाठी 40 कोटी 98 लक्ष 49 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात असा 75 किमीच्या रस्त्यांसाठी 66 कोटी 86 लक्ष व देक्षभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी एकूण सुमारे 70 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन, पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील यांचे आभार मानले आहेत.‎

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान ! – ना. गुलाबराव पाटील


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्तेखऱ्या अर्थाने दर्जेदार होत आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी 75 लाख रुपयांच्या निधीची तरतूद असून मक्तेदारावर 5 वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या योजनेत रस्त्यांचे काम दर्जेदार‎ होणार असून गावांतर्गत काँक्रीट रस्ते,‎ आवश्यक तेथे पूल , संरक्षक भिंती‎ आदी कामांचा समावेश असल्यामुळे परिपूर्ण रस्त्याचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक व वरदान ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात संबंधीत शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामीण भागासाठी वरदान ठरत असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला सदर रस्ते दर्जेदार होण्यासाठी यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देशही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १८ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंगालच्या जनतेने एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली : बाबुल सुप्रियो

May 3, 2021

“… तेव्हा नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला”, : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 3, 2021

जळगावातही मनसेचा रेल्वेला ‘संविनय कायदेभंग आंदोलन’चा इशारा !

September 27, 2020

शिवार तिथे गोदाम योजनेला प्रोत्साहन देणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ग्वाही !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group