नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे ६३ लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे ९९ हजारांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे ५३ लाखांपेक्षा जास्त जणांनी देशात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे
दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, पुन्हा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तसेच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. काल १ ऑक्टोबर रोजी देशात १० लाख ९७ हजार ९४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत देशभरात ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
















