जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रेसिडेंट हॉटेल येथे 94.3 MY FMतर्फे प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी फँटास्टिक फार्मर अवॉर्ड वितरणाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.
94.3 MY FM तर्फे हॉटेल प्रेसिडेंट येथे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम म्हणून, शेतीत वेगवेगळ्या पद्धती वापरून, नव्या आधुनिक तंत्राचा वापर करून, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी फँटास्टिक फार्मर अवॉर्ड वितरणाचा कार्यक्रम पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक-डी. डी. बच्छाव, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तर आभार प्रदर्शन माय एफ.एमचे विवेक पॉन यांनी केले.















