जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील काही भागांमध्ये एक गूढ आवाज ऐकू आल्याने परिसर हादरून गेला. या आवाजाबद्दल काही ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हा आवाज भूकंपाचा नव्हता. या गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील काही भागांमध्ये पाच वाजता दोन वेळा गूढ आवाज ऐकू आल्यावर परिसरात कंपनही जाणवला. शहरी तसेच ग्रामीण भागातही या आवाजाची गोंधळजनक गूढता जाणवली. नागरिकांनी प्रशासनाला भूकंपाच्या संभाव्यतेबद्दल सूचना दिल्या, परंतु जिल्हा प्रशासनाने नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला. चाळीसगावमध्ये दोन वेळा आवाज ऐकू आल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने याबाबत तपास सुरू केला, पण या आवाजाचं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
भूकंपाची नोंद नाही – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
दुसरीकडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं की चाळीसगाव मध्ये भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही. मात्र, एकापाठोपाठ दोन मोठे आवाज आल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. प्रशासनाने नागरिकांना सूचित केलं आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि शांती राखा.