रावेर (प्रतिनिधी) चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. ही घटना रावेर तालुक्यातील आभोडा येथे घडली. आशा संतोष तायडे अशा मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला.
सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील आभोडा या गावात आशा तायडे या महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास होती. त्यांचे पती संतोष तायडे याने चरित्राच्या संशयावरून गळा दाबून पत्नीचा खून केला. ही घटना सोमवारी ३१ मार्च रोजी समोर आली. दरम्या, पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.