भुसावळ (प्रतिनिधी) : जुन्या वादातून भुसावळच्या सिंधी कॉलनीतल्या बडी धर्मशाळेजवळ एका तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला. यात २६ वर्षीय सागर राजकुमार कुकरेजा गंभीर जखमी झाले असून, रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सागर कुकरेजा हे २७ जानेवारीला रात्री १०.३० वाजेच्या सुमारास धर्मशाळेकडून जात असताना संशयित नारायण थारवानी, रवी थारवानी आणि पवन थारवानी यांनी त्यांना अडवले. त्यावेळी वादविवादाला सुरुवात झाली आणि सशयितांनी सागरला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत नारायण थारवानी याने चाकू काढून सागरच्या डोक्यावर आणि कानावर वार केले. सागर सोबत असलेले गौरव कुकरेजा यालाही संशयितांनी मारहाण केली. या हल्ल्यात सागर गंभीर जखमा झाला असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सागर कुकरेजा यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजार पोलीस ठाण्यात नारायण, रवी आणि पवन थारवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील तपास करत आहेत.















