दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखांची बॅग चोरी !
चोपडा (प्रतिनिधी) येथील कैनरा बँकेमधून २ लाख ५० हजार रुपये काढून ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. या पैशांची बॅग अज्ञात व्यक्तीने डिक्कीमध्ये ठेवलेली रक्कम व त्यासोबतचे बँकेचे व कर्जाचे कागदपत्र असलेली कापडी पिशवीसह लंपास केल्याची घटना घडली.
चोपडा तालुक्यातील गणपूर येथील गोपाल संतोष पाटील (वय ३९) यांनी कैनरा बँकेमधून २ लाख ५० हजारांची रक्कम काढली. त्यानंतर पाटील यांनी हे पैसे एका बॅगमध्ये ठेवले. तर पैसे असलेली ही बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान, पल्सर कंपनीची दुचाकी (एमएच १२, टीजे ०७९२) वरील दोन अनोळखी व्यक्तींनी ही बॅग चोरुन नेली. या प्रकरणी गोपाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश हिरे करत आहेत.