जामनेर (प्रतिनिधी) लघु उद्योगासाठी २५ केव्हीच्या डी.पी.साठी मंजुरी देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणाऱ्या विज वितरण विभागातील कनिष्ठ अभियंता हेमंत शालिग्राम पाटील याला पसार होण्यापूर्वीच औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जामनेरच्या घरातून मध्यरात्री अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक पथक येणार असल्याचा सुगावा लागल्यानंतर हेमंत पाटील हा आपल्या चारचाकी वाहनातून पळ काढण्याच्या बेतात होता.परंतू त्याच्या मागावर असलेल्या पथकाला तो नेरी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. रात्री तो जामनेरला निघाल्याची माहिती मिळताच पथकाने शिवाजी नगरमधील त्याच्या घरातून अटक केली. शनिवारी पाटील याला जळगाव येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक शुभांगी सुर्यवंशी, राजेंद्र जोशी, राजेंद्र लाचलुचपत प्रतिबंधक पथक सिनकर, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण व चांगदेव बागुल यांनी पाटील यांनी अटकेची कारवाई केली.
















