जळगाव (प्रतिनिधी) धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रामानंद पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात राघो बाबुराव पाटील (वय ६५,धंदा – किराणा दुकान चालक रा. गट न ११९ प्लॉट नं. २ मुकुंद नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने परिसरातील सार्वजनीक जागेत धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ उषा सोनवणे हाय करीत आहेत.