TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘उद्योगपतींचा फायदा असेल तर कोणताच पुरावा मागत नाही’ : राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाने मृत पावलेल्यांना मदत देण्याची मागणी झाली तेव्हाही डेटा उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. आता शेतकऱ्यांच्या बाबतीतही तेच उत्तर सरकार देत आहे. हेच सरकार त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींचा फायदा होत असेल तर मात्र कोणताच पुरावा मागत नाही. ते काम झटपट केले जाते, असा गंभीर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.

‘सत्ताधाऱ्यांना अहंकार झाला आहे. त्यांच्यात गर्विष्ठपणा आला आहे. त्यांना वाटतं आम्ही सत्तेत आहोत तर कुणाचे ऐकण्याची गरज नाही. त्यांनी माणुसकीही सोडली आहे’, असे तिखट शब्द वापरत राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला व शेतकरी आंदोलनातील मृतांच्या वारसांना भरीव मदत मिळावी यासाठी दंड थोपटले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

कृषी कायदे मागे घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. कायदे चुकीचे होते म्हणून त्यांना माफी मागावी लागली. असे असेल तर मग या कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करताना मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा विचार सरकारने करायला नको का?, असा बोचरा सवालच राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला. आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील उपलब्ध नसल्याने मदत देता येणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. पंजाबमध्ये आमचे सरकार आहे. आमच्या सरकारने ४०३ मृत शेकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली आहे. कुटुंबातील एका सदस्याला आम्ही नोकरीही देत आहोत. एकूण ५०० मृतांची अधिकृत यादी आमच्याकडे आहे. त्याशिवाय आणखी २०० शेतकरी मृत पावले आहेत. या सर्वांना केंद्राकडूनही मदत मिळाली पाहिजे. हा डेटा मी सोमवारी संसदेत मांडणार आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवून यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीच राहुल यांनी केली. शेतकरी आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन मिनिटं मौनही संसदेत पाळलं गेलं नाही. त्यावरून या सरकारची मानसिकता कळून येते, असेही राहुल म्हणाले.

सरकारला मदत द्यायची नसली की कारणे सांगितली जातात. कोरोनाने मृत पावलेल्यांना मदत देण्याची मागणी झाली तेव्हाही डेटा उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. आता शेतकऱ्यांच्या बाबतीतही तेच उत्तर सरकार देत आहे. हेच सरकार त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींचा फायदा होत असेल तर मात्र कोणताच पुरावा मागत नाही. ते काम झटपट केले जाते, असा गंभीर आरोपही राहुल यांनी केला. मोदींकडे फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांचे नंबर आहेत तर आमच्याकडे सर्व शहीद शेतकऱ्यांची नावे आणि नंबर आहेत. जर पंतप्रधानांना माफी मागायचीच असेल तर त्यांनी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. फोन करून त्यांना धीर द्यावा, मदतीचा हात द्यावा, असे आवाहन राहुल यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

November 20, 2020

The Chainsmokers Actually Make a Great Nickelback Cover Band

June 27, 2020

व्हेंटीलेटर्स पुरवणाऱ्या कंपनीकडून मागितली १५ लाखांची लाच, पालिका अधिकाऱ्याला अटक

April 9, 2021

विकास कामासंदर्भात नागरिक आता जाब विचारतात, दिलेले आश्वासन पाळा : एकनाथराव खडसे

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group