भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील गोदावरी रुग्णालयामागे धाडसी घरफोडी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 79 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुसूम रमेश कोल्हे (70, प्लॉट नंबर 29, प्रोफेसर कॉलनी, गोदावरी हॉस्पीटल, भुसावळ) या सेवानिवृत्त पेन्शनर आहेत. गत महिना ते 20 जुलैदरम्यान कोल्हे या गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करीत 75 हजार रुपये किंमतीची अडीच तोळे वजनाची पोत, दोन हजार रुपये किंमतीचे स्टीलचे पातेले, दोन हजार रुपये किंमतीची पाण्याची टाकी असा एकूण 79 हजारांचा ऐवज लांबवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे व सहकार्यांनी भेट दिली. तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहेत.