कासोदा (प्रतिनिधी) गावातील एका घराचे बंद दर तोडून चोरट्यांनी तब्बल २ लाख ४० हजाराचा रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कासोदा येथील किराणा दुकान चालक असलेल्या विजय शिवाजी वारे यांच्या घराचे बंद असलेले कुलूप तोडत अज्ञात चोरट्यांनी दि. २८ रोजी घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाक रूममधील डब्यात कापडी पिशवीत ठेवलेले २ लाख ४० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी फिर्यादी विजय शिवाजी वारे यांनी कासोदा पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.सहदेव घुले हे करित आहेत.