TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणागावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदिवासी समाजाच्या मेळाव्यात प्रतिपादन !

vijay waghmare by vijay waghmare
August 10, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आदिवासी समाजाच्या खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आदिवासी बांधवांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. भविष्यातही एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही देवून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. मंजूर 10 कोटी निधीतून मतदार संघातील 51 गावांतील आदिवासी वस्त्यांवर सौर दिवे बसविले जाणार असून माझ्यासह शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे‌. असा विश्वास व्यक्त करून धरणगावात तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आदिवासी दिनाच्या व महसूल पंधरवाड्या निमित्ताने धरणगाव येथे जी. एस. लॉन्सवर आयोजित आदिवासी बांधवांच्या मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी मनोज कुमार गायकवाड हे होते.

पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की आदिवासी लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. यावर्षी चांदसर सह जिल्ह्यात तब्बल सहा शाळा , एक वस्तीगृह बांधकामासाठी कोट्यावधी निधी मंजूर असून तालुक्यात ख्वाजाजी नाईक स्मारकाचे काम सुरु आहे. आदिवासी बांधवांनी एकजुटीने उभे राहून लाडकी बहिण योजनेसाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ व धनुष्यबाण देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी “धनुष्यबाणाच्या अस्मितेसाठी” सतत झटत राहणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

READ ALSO

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार सूर्यवंशी यांनी महसूल पंधरवावाड्यात राबविण्यात आलेले उपक्रमाविषयी व जागतिक आदिवासी दिनानिमित्त सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक आर. डी. महाजन सर यांनी केले. तर आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मांनले. यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे व राज्याचे टायगर सेनेचे प्रवक्ते पंढरीनाथ मोरे यांनी पालकमंत्र्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या कामाविषयी आभार व्यक्त करून घरकुल धारकांना मोफत जागा उपलब्ध करून द्या, वन हक्क कायद्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात, धरणगाव येथे सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे यासह ११ मागण्या मागत मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक , भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील 374 जातीचे सर्टिफिकेट, 112 रेशन कार्ड आणि 453 उत्पन्नाचे दाखलेतसेच आदिवासी घटकांच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ व दाखले वाटप करण्यात आले. व्यासपीठावर प्रांताधिकारी मनोजकुमार गायकवाड , तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ते पंढरीनाथ मोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, आदी मान्यवर व्यासपीठावर तर आदिवासी टायगर सेनेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी संभाजी सोनवणे, विकास मालचे, सुनील सोनवणे, शरद पवार, विजय मालचे, रामचंद्र वाघ, गटनेते पप्पू भावे, रविंद्र कंखरे, बूट्या पाटील, यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !

June 29, 2024

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

September 1, 2023

अनोरे येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी टाकली गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड !

November 12, 2021

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सभा संपन्न

September 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group