जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’व्हावे ही बाळासाहेबांची ईच्छा होती. औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याबाबत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रित बसून तोडगा काढतील असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही हा तोडगा निश्चितच काढणार आहोत. अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’व्हावे ही बाळासाहेबांची ईच्छा होती. कोणत्याही शिवसैनिकांने औरंगाबाद कधीच संबोधले नाही, त्यांच्या मुखात नेहमी ‘संभाजीनगर’असाच उच्चार झाला आहे. त्यामुळे संभाजीनगर नाव देणे चुकीचे नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करतांना मंत्री पाटील म्हणाले, कि भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा दावा आजचा आहे. मात्र शिवसेनेचा जन्मच हिंदुत्वासाठी झाला आहे. शिवसेनेचा पहिला आमदार हिंदुत्वामुळे रद्द झाला आहे. विलेपार्ले येथील शिवसेनेचे पहिले आमदार निवडून आले होते. परंतु हिदुंत्वामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली होती. तरीही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही.
तिन्ही पक्ष एकत्रित बसून तोडगा काढतील : अजित पवार
‘महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा मुद्दा काही घटकांकडून पुढे केला जातो आहे. परंतु तिन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या मुद्द्यांवर एकत्रित बसून तोडगा काढतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, आघाडीतील तिनही पक्ष पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचारानं मार्ग काढू,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.















