जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुकृती अपार्टमेंटसमोर एका मोटारसायकल चालकाने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची घटना घडली. विशेष म्हणजे मोटार सायकलस्वार हा पोलिसांप्रमाणे पोलिसांची काठी घेऊन फिरत होता. परंतु हा मोटरसायकल स्वार पोलीस नव्हे तर महसूल कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण घटना कारच्या डॅश कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ आता सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे.
जयेश ठाकूर हे त्यांच्या कारमध्ये बसले असताना, मोटारसायकल चालवणारा तलाठी मनोहर बाविस्कर हा समोरून येऊन अचानक खाली उतरला. नंतर कोणतेही कारण नसताना शिवीगाळ केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.