पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळकोठे येथे दिनांक ९ रोजी सायंकाळी अंगावर विज पडल्याने शेतकरी बापू डिगंबर शिरसाठ (वय ४४) हे गंभीर जखमी झाले होते.
बापू शिरसाठ यांचा दि. २० रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरसाठ हे पावसात सायकलीवर घरी येत होते. गावाजवळच त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांना मुंबई येथे उपचारासाठी हलवले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी नेले होते.