बोदवड (प्रतिनिधी) शहरातील तहसील कार्यालया समोर जिजाऊ जयंती निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोदवडचे नगराध्यक्ष आनंद पाटील, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल ,नगरसेवक राजेश नानवाणी यांच्या हस्ते हिरवी झेंंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचा उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील, कन्या संजना पाटील ,मुलगा हर्षराज पाटील ,उद्योजक अनुप हजारी, अनिल गंगतीरे , निलेश माळी ,हर्षल बडगुजर, संजय पाटील, निवृत्ती ढोले, शांताराम कोळी, अनंता वाघ, कलीम शेख, अजय पाटील, आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले .कार्तिक अनिल कोल्हे या विद्यार्थ्याने जिजाऊंचा पोवाडा सादर केला व मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस सहभाग प्रमाणपत्र ट्रॉफी वाटप करण्यात आले.
मॅरेथॉनमध्ये मुलांच्या गटात प्रथम सुनील रामदास बारेला जळगाव, द्वितीय बक्षीस मुकेश रमेश धनगर, तृतीय बक्षीस सचिन राठोड पळसखेडा, बोदवड मुलींमध्ये प्रथम बक्षीस अश्विनी नामदेव काटोले शिरसोली जळगाव ,द्वितीय अनिता मनीष बारेला जळगाव,तृतीय बक्षीस ममता खोंदले चिंचखेडा तालुका मुक्ताईनगर, तसेच या वेळी सामान्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आलं. विपुल प्रवीण पाटील जनता हायस्कूल नेरी, द्वितीय बक्षीस रोहित रमेश तायडे ,तृतीय बक्षीस गोविंदा गजानन घोडके बोदवड, उत्तेजनार्थ बक्षीस कल्याणी प्रमोद मराठे, यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेला जिल्ह्यासह शेजारील मलकापूर ,बुलढाणा ,वालसावंगी नंदुरबार ,संभाजीनगर, या ठिकाण च्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ४० मुली,व १४० मूले,असे एकूण १८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता छत्रपती ग्रुप बोदवड द्वारे या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शैलेश वराडे,गणेश मुलांडे ,दीपक खराटे ,गणेश,सोनोने, राजेंद्र वराडे, गोपाल पाटील ,पवन पाटील, यांनी परिश्रम घेतले.