चोपडा (प्रतिनिधी) आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात आदिवासींच्या नृत्याच्या व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. आदिवासी बांधव आज नटून थटून चोपडा शहरात आले होते. आदिवासी बांधवांनी भव्य शोभायात्रा काढली. याअगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीत बिरसा मुंडा व आदिवासींची कुलदैवत मोगी माता त्यांच्या प्रतिमेला आमदार लताताई सोनवणे यांनी माल्यार्पण केले. नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतून बस स्टॅन्ड तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे शोभायात्रा निघाली. यावेळी आमदार लता सोनवणे यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.
आझाद चौकमार्गे परत कृषी उत्पन्न बाजार समिती समारोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, माझी पंचायत समिती उपसभापती व्ही नाना पाटील, शिवसेना शिंदे गटाचे सुकलाल कोळि, कैलास बाविस्कर, आदिवासी दूत संजय शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी , मार्केटचे नवनिर्वाचित संचालक किरण देवराज, प्रकाश राजपूत, गोरख कोळी ,मंगलाताई पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषीउत्पन्न बाजार समितीतून हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव ढोल तासे, व पारंपारिक आदिवासी वाद्या त्यावर नृत्य करत व प्रत्येकाच्या हातात आदिवासी तीर कामठा त्यासोबत आदिवासी हत्यार तसेच बिरसा मुंडा यांच्या ध्वज प्रत्येकाच्या हातात दिसत होता. नृत्य करताना लताताई सोनवणे यांनाही आदिवासी नृत्यवर ठेका घेण्याच्या मोह आवरला गेला नाही. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ,कैलास बाविस्कर, अनिल बाविस्कर, यांनी देखील आदिवासी वाद्यांवर ठेका घेतला.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बोलताना सांगितले की, आदिवासी दिवस हा पूर्ण राज्यात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आदिवासी बांधवांसाठी एक प्रकारे दसरा दिवाळीच होय. त्यांच्या न्याय हक्कासाठी ते एक दिवस एकजुटीने आम्ही एक आहोत हे दाखवून देतात. याप्रसंगी प्रताप बारेला यांनी आमदारांच्या समोर सूचना ठेवल्या की, चोपडा शहरात क्रांतिकारी बिरसा मुंडा या महापुरुषांचा पुतळा हवा तोही आपल्या कारकीर्दीतच व्हायला पाहिजे, असेही प्रताप बारेला यांनी सर्व आदिवासी बांधवांकडून मागणी केली. त्यावर आमदार लता सोनवणे यांनी मला जागा दाखवा क्रांतिकारी बिरसा मुंडांच्या पुतळा नक्की बांधून दिल, असे आश्वासन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह आमदारांनी दिला.
सकाळी अकरा वाजेपासून निघालेली शोभायात्रेणा समारोप जवळ पास चार वाजेला झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातील सर्व आदिवासी बांधवांना भोजनाच्या स्वाद देखील देण्यात आला. आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी शहरात शिंदे शिवसेना गटात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव हजर होते. यावेळी पोलिसांनी देखील चोक बंदोबस्त ठेवला होता. डी वाय एस पी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय के.के. पाटील, पीएसआय घनश्याम तांबे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी हजर होते.