धरणगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवार, दि.९ रोजी धरणगाव शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. शंभरपेक्षा अधिक मशालींचा समावेश असलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदार संघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून गावा-गावात जाऊन डोअर टू डोअर प्रचार केला जाता आहे. करणदादा पाटील यांनी आतापर्यंत पाचोरा, भडगाव, अमळनेर, चाळीसगाव, जळगाव आदी तालुके पिंजून काढले आहेत. गुरुवार, दि.९ रोजी धरणगाव शहरासह तालुक्यातील नांदेड, साळवा, भोणे, बिलखेडा, जांभोरा आदी गावांमध्ये रॅली काढण्यात आल्या.
धरणगाव शहरातून काढण्यात आलेल्या मशाल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत तब्बल शंभरावर तरुण व नागरिक पेटत्या मशाल घेवून सहभागी झाले होते. त्यामुळे धरणगाव शहर प्रकाशमय झाले होते. ढोल ताशांचा गजर आणि करणदादा पाटील यांचा विजय असो, करणदादा पाटील तुम आगे बढो, हम तूम्हारे साथ है यासारख्या घोषणांनी धरणगाव शहर दणाणले होते. तरुणांनी करणदादा पाटील, धरणगाचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून लांडगे गल्ली, जवाहर रोड, भावे गल्ली, कोट बाजार परिसर, महावीर चौक, आठवडे बाजार, मेन रोड, तेलाची गल्ली, जय संताजी महाराज चौक, पाटील गल्ली, लहान माळीवाडा, श्री संत तुकाराम महाराज चौक, मोठा माळीवाडा, महात्मा फुले चौक, धरणे चौक मार्गे पुन्हा महावीर चौक, मातोश्री कॉम्प्लेक्स, नेताजी रोड भाटिया गल्ली, अहिल्यादेवी होळकर चौक, बस स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीत शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र पाटील, तालुका युवक अध्यक्ष मनोज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, रघुनाथ पाटील, रंगराव सावंत, डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन पाटील, भोदचे सरपंच संभाजी पाटील, चावलखेडाचे सरपंच राजीव वाणी, भंवरखेडाचे सरपंच किरण पाटील, माजी युवक अध्यक्ष अमोल हरपे, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, ग्रंथालय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, पिंप्रीचे माजी सरपंच विजय सूर्यवंशी, सुनील पाटील, दादाभाऊ पाटील, रवींद्र पाटील, नाना पाटील, बाळा पाटील, मकर धवज, दगडू पाटील, पिरण पाटील, शांताराम जाधव, बिलखेडाचे सरपंच बंडू काटे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष चंपालाल भदाणे, प्रहारचे तालुका उपाध्यक्ष अरुण पाटील, महेंद्र चव्हाण, उत्तम भदाणे, सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, योगेश भदाणे, काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रमिला भदाणे यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.