धरणगाव (प्रतिनिधी) आप्पासाहेब जगन्नाथ जी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल असोसिएशन, धरणगाव तर्फे एक विशेष महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवासेना जिल्हा संघटक विनोद सुरेश रोकडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. या शिबीरात दुपारपर्यंत 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने, मेडिकल असोसिएशन तर्फे विनोद रोकडे यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये अध्यक्ष सुधाकर वाणी, सचिव छोटू भाऊ जाधव, ऍड. वसंतराव भोलाने, नगरसेवक नंदू पाटील, रवी जाधव, रोहित चौधरी, भाऊसाहेब पाटील यांच्यासह डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. या रक्तदान शिबीराच्या आयोजनाने सामाजिक दायित्वाची जाणीव जागृत केली असून, स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात भाग घेतला.