चोपडा (प्रतिनिधी) जुन्या वादातून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश ओंकार बारेला, असे मयत तरुणाचे नाव आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी वैजापूर गावात पिकप चालवत असलेला सुरेश बारेला हा मध्यप्रदेश मध्ये काही जणांना घेऊन जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्याने त्यात चार जणांच्या मृत्यू झाला होता. याचाच राग मनात ठेवून दोन-तीन वर्षांपूर्वी तुझ्या गाडीतून चार जणांच्या मृत्यू झाला आहे. तु कसा बाहेर फिरतोय?, यावरून जमावाने सुरेश बारेला याला दांडक्याने मारहाण केली. डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने तो गंभीर झाला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी जळगाव जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरेश बारेला, अशोक कोळी, केरीया बारेला, प्रवीण बारेला, धरमसिंग बारेला, विजय बारेला याच्यासह महिला आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सुरेश बारेला खून प्रकरणात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतपर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पाचोरा, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी दिली आहे.