पुणे (वृत्तसंस्था) देशाला कोरोना लस देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे नाव जगभरात झाले आहे. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटमधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. कोरोना व्हायरस वर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. हडपसरजवळ गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सीरम प्लांटला आग लागली आहे. याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान याठिकाणच्या संशोधकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे.
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (२१ जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दोन तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागली. दोन वाजून ३७ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीची माहिती मिळाली. जवानांकडून तिघा कामगारांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. “इन्सिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही”. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का ? याचीही पाहणी करत आहेत. दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
आग नेमकी का लागली याची चौकशी करून माहिती द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली, अशीही माहिती मिळते आहे. मात्र करोनाची लस याठिकाणी तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. देशात या लसीच्या आपत्कालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोव्हिशील्ड लसीचे डोस ११ जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीचे काही डोस देशातील प्रमुख १३ शहरांमध्ये रवाना झाले.