भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे नेहमी सांगून वारंवार मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात असे की, तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन तरुणीस सुमारे ०६ महिन्यापासून व दि. ४ सप्टेबर २०२२ रोजीच्या मध्यरात्री ९:४५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन तरुणीच्या राहते घरासमोर तसेच परीसरात वेळोवेळी संशयित आरोपी सचिन पाटील याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन हात धरुन माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडते असे म्हणून बळजबरीने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच त्याने त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी फोटो फिर्यादीस दाखवून माझ्याशीच लग्न कर नाहीतर, आपला दोघांचा फोटो मी व्हायरल करेल व समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली आहे. तसेच मी तुझे आई वडीलांना सत्तर हजार रुपये दिले आहे. अशी तुमची समाजात खोटे सांगून पीडित मुलीच्या आई वडीलांची बदनामी करीत आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी अमोल पवार हे करीत आहेत.