बोदवड (प्रतिनिधी) शहरातील शारदा कॉलनीतील रहिवासी चंद्रकांत महादेव पाटील (वय ३६) याने आज सकाळी रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
चंद्रकांत पाटील याने आज सकाळी १० चे सुमारास खांब क्रं ४६८/४१जवळ मालगाडीचे इंजिन समोर येऊन आत्महत्या केली. मयत पाटील यांचे पश्चात आई ,वडील ,पत्नी एक मुलगा ,दोन मुली असा परिवार आहे. या घटनेबाबत रेल्वे पॉइंट्समन ललीतकुमार कौशिक यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ.अयुब तडवी हे करीत आहेत.