जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आषाढी वारीचे महत्व सर्वच समाजात आहे. ही केवळ धार्मिक वारी नाही तर सामुहिक भक्ती, सामाजिक एकता, समानता आणि बंधूता या दिशेने मानवजातीने केलेला प्रवास आहे. पण या वारीत सहभागी होणाऱ्या मानवांच्या स्वभावाचे पदर त्या त्या काळ व प्रसंगानुसार लागू होतातच. त्यामुळे समाज वास्तव मांडतांना मानवाप्रती संवेदशीलता जपली पाहिजे हे सांगणारे नाट्य पालखी बुधवारी राज्य नाट्य स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सादर झाले.
इंदाई फाऊंडेशन बदरखे, ता.पाचोरा, जि.जळगाव यांनी दिवा मोकाशी यांच्या प्रत्यक्ष जीवनानुभावावर आधारित पालखी या पुस्तकाचे नाट्यरुपांतर शंभू पाटील तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांनी केले होते. पंढरपूर वारीमध्ये जातीचे महत्त्व शून्य आहे, कारण ही एक अशी आध्यात्मिक यात्रा आहे जिथे कोणत्याही जातीधर्माचा भेद नसतो; सर्व वारकरी एकत्र येऊन विठ्ठलाची भक्ती करतात. वारी हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे, जे माणसाला अहंभाव दूर करून सर्व मानवजातीप्रति समभाव शिकवते. या वारीमुळेच विविध जातींमधील लोक एकत्र येऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र एकभावनेने चालतात आणि या सोहळ्याचा एक भाग बनतात.
तांत्रिक बाजूत अजय पाटील (प्रकाशयोजना), अक्षय नेहे (नेपथ्य), राहुल निंबाळकर (पार्श्वसंगीत), दर्शन गुजराथी (पार्श्वसंगीत सहाय्य), सोनाली पाटील (वेशभूषा), जयश्री पाटील (रंगभूषा), जागृती भिडे (नृत्य दिग्दर्शन), पुरुषोत्तम चौधरी, वसंत गायकवाड, यशवंत गरुड, हेमंत भिडे, सुनील बारी, मनोज पाटील, प्रविण पाटील, किशोर पवार, विनोद अजनाडकर, योगेश चौधरी यांची होती.
या नाट्यात हर्षल पाटील, मानसी गगडानी, मंगेश कुलकर्णी, श्वेतांबरी गरुड, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, नेहा पवार, मंजुषा भिडे, अक्षय नेहे, वरुण नेवे, मोना निंबाळकर, कवीर निंबाळकर, दर्शन गुजराथी, धम्मपाल निकम, रविशंकर ठाकरे, योगिता भालेराव, जागृती भिडे, सोनाली पाटील, जयश्री पाटील, भारती माळी, समृध्दी पाटील, मनिषा बाविस्कर, अंजली पाटील, निलीमा जैन, पौलमी पाटील, खुशबू चिंचोले, प्राजक्ता निकम, वेदिका पाटील, अपेक्षा निकम, भावना कदम, जागृती कोळी, समीक्षा पाटील, गणेश सोनार, पवन भोई, ज्ञानदेव तळेले या कलावंतांचा सहभाग होता.
















