जळगाव (प्रतिनिधी) चोपडा येथील क्रीडा शिक्षकाचा जळगावात रस्त्यावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. विकास पंडीतराव काेष्टी(वय 57) असे या शिक्षकाचे नाव असून ते साेसायटीच्या वार्षिक सभेसाठी जळगावात आले हाेते.
चाेपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात विकास पंडितराव काेष्टी हे पर्यवेक्षक पदावर अाहेत. ते क्रीडा शिक्षक व इंग्रजी विषय शिकवतात. ते सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेच्या विसर्जन मिरवणूक काढण्यात अाली. त्यात विद्यार्थी नाचलेत. त्याच्या साेबत काेष्टीसर देखील सहभागी झाले हाेते. त्यानंतर ते ग.स. साेसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने जळगावात एसटी बसने आले.
शाळेचे इतर शिक्षक सुनिल पाटील, विनाेद पाटील कपील बाविस्कर, निलेश पाटील, मदन भाेई, ग्रंथपाल विनाेद पाटील हे खासगी वाहनाने आले. काेष्टी सर सभेला काही वेळ हजर राहून कामानिमित्त जिल्हापेठेतून पायी जात असताना पदमालय भाेजनालयाजवळील विघ्नहर्ता नेत्रालयासमाेरून जात असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते नेत्रालयाच्या पायरीवर बसले. त्यांना दरदरून घाम फुटला. यानंतर त्यांची शुध्द हरपली. यावेळी जवळपासच्या लाेकांनी त्यांना रुग्णालयात नेले. या ठिकाणी डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कस्तुरबा विद्यालयाचे इतर पाच सहा शिक्षक हे खासगी वाहनाने आले हाेते. ते सभेला हजेरी लावून परतले हाेते. तर काेष्टी सर हे त्यांना इतर काम असल्याने एकटेच थांबले हाेते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा जीव गेल्याची माहिती मिळाल्याने सर्व शिक्षक परत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आले. यावेळी चाेपड्यातील इतर शाळेतील शिक्षकांनीही गर्दी केली हाेती.