जळगाव (प्रतिनिधी) बापूसाहेब संतोषराव सूर्यवंशी संचलित खान्देशातील समस्त मराठा पाटील समाजाचा वधू-वर व पालक परिचय मेळावा १८ एप्रिल रविवार रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात होणार आहे.
या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते ७५१ तरुण-तरुणींचे नावे असलेल्या सूची पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. या मेळाव्यात विवाह इच्छूक सरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार, छोटे, मोठे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, विधवा, परित्यक्त्या, विधूर, घटस्फोटीत, अपंग तरुण, तरुणीसुध्दा परिचय देणार आहेत. या मेळाव्यात अनेक विवाह जुळण्याचे संकेत आहेत. त्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संतोषराव सूर्यवंशी यांनी केले आहे.