धरणगाव (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ यांनी दसरा मेळाव्याला जात असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख करणाऱ्या गुलाबराव वाघ यांच्यावरयोग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन धरणगाव पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ठाकरे गटाचे जळगांव जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख श्री गुलाबराव वाघ यांनी मुंबई येथील ठाकरे गटाच्या मेळाव्या प्रसंगी प्रसिध्दी माध्यमांसमोर प्रतिक्रीया देतांना श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा नांवा बाबतीत एकेरी शब्दात उल्लेख केला असून या घटनेचा निषेधार्थ आम्ही शिंदे गटाचे सर्व समर्थक शिवसैनीक बांधव तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ग्रामीण भागतील व शहरी भागातील सर्व महाराजांना माननारे व प्रेम करणारे नागरीक बांधव यांच्या वतीने निवदेन सादर करीत आहोत, सदर व्यक्ती यांच्या योग्य ती कार्यवाही करून चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती.
या निवेदनावर पी.एम.पाटील, नगरसेवक विनय भावे, वासुदेव चौधरी, मोतीआपा पाटील, गजानन पाटील, निंबा कखरे, देविदास पाटील, निलेश भदाणे, दीपक भदाणे, मछिद्र पाटील, शरद पाटील, स्वप्नील पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.