नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबाद नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या महामार्गापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या काँक्रिटीकरण झालेल्या भर रस्त्यावरच्या बांधकामाच्या बाहेर आलेल्या आसाऱ्या आणि मोठ्या खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी चार चाकी टाटासमो या गाडीचे टायर फाटले. टू व्हीलरचे टायरचे ट्यूब फाटले व एका तरुणाला रात्री चालताना आसारी पायाला लागून जखमी झाला. रात्री चालताना त्या रस्त्यावर मोबाईलचा टॉर्च लावून चालावे लागते. कारण लाईटचा प्रकाश कमी असल्याने आसाऱ्या ह्या दिसत नाहीत. वास्तविक रस्ता नगर परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने याची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. मात्र, नशिराबाद नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. कारण या रस्त्याने नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी ये जा करत असतानाही समस्या सोडवण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. निवेदन देण्यासाठी स्वयंशोप फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, किशोर पाटील, प्रा. डॉ .विश्वनाथ महाजन ,नरेंद्र धर्माधिकारी ,नीरज चितोडे, सौरभ चौधरी, सागर धोबी ,दिनेश सावळे , माधव चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.