अमळनेर (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला संपन्न झाली. गीता जयंतीनिमित्त आयोजित या ‘गीता वाग्यज्ञ’ व्याख्यानमालेस श्याम देशपांडे (अमरावती) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या सहकार्यातून दि. २५ ते २७ डिसेंबर दरम्यान ही ऑनलाईन व्याख्यानमाला संपन्न झाली. पहिल्या दिवशी ‘गीतोक्त आत्मस्वरूप विवरण’ या विषयावर श्याम देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण व मुद्देसूद विवेचन केले. व्याख्यानमालेचे उद्घाटन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी ऑनलाईन पध्दतीने केले. यावेळी प्रताप तत्वज्ञान केंद्राचे कार्याध्यक्ष प्रा. सुधीर पाटील हे अध्यक्षस्थानी होते. दुस-या दिवशी ‘गीतोक्त भक्तिचे विवरण’ या विषयावर झालेल्या व्याख्यानप्रसंगी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. मनिष जोशी हे प्रमुख अतिथी तर सिनेट सदस्य दिनेश नाईक हे अध्यक्षस्थानी होते. तिस-या दिवशी ‘श्रीकृष्णाचा समारोपीय उपदेश’ या विषयावरील व्याख्यान झाले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. नितीन बारी हे प्रमुख अतिथी तर प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. या ऑनलाईन व्याख्यानमालेचा सुमारे ३९०० श्रोत्यांनी लाभ घेतला. या तीन दिवसीय व्याख्यानमालेत व्याख्यानाच्या आधी कृष्णप्रिया गढीकर हिने गीता महात्म्य व सुलभा गढीकर यांनी श्रीकृष्ण गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राधिका पाठक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. धिरज वैष्णव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तांत्रिक सहकार्य पंडीत नाईक, संकल्प वैद्य यांचे लाभले.