मुंबई (वृत्तसंस्था) बँकेमध्ये (Bank Job) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) यांच्या आस्थापनेवरील मंडळ आधारित अधिकारी (Board based officers) पदांच्या एकूण १२२६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क : खुला/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांसाठी ७५०/- रुपये फीस आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.