धरणगाव (प्रतिनिधी) अध्यक्षीय भाषणात ना. गुलाबराव पाटील यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून केवळ संतदर्शन, संत पूजन व संतसेवेसाठीच हा कार्यक्रम घेतल्याचे स्पष्ट करून लवकरच जळगाव येथे भव्य वारकरी भवन उभारण्याचा संकल्प बोलून दाखवला. वारकर्यांनी सर्व साधकांची गाव, तालुका, जिल्हा व विभागनिहाय नोंदणी केली पाहिजे. वारकरी संप्रदायाशी आपली पहिल्यापासून नाळ जुडलेली आहे. या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असते. वारकरी तत्वज्ञान हे खऱ्या अर्थाने समाजाला दिशादर्शक आहे. वारकरी संप्रदायाचा विचार हाच समाजाला तारू शकतो. म्हणूनच पांडुरंगाच्या अधिष्ठानाशिवाय जीवनास प्राप्ती नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही।। असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते परमपवित्र पुरुषोत्तममास निमित पाळधी येथील सुगोकी सभागृहात आयोजित “संत संमेलन” कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.*
किर्तनकारांना लावले वाण !
या संत संमेलन प्रसंगी उपस्थित ह. भ. प. किर्तनकार यांना रुमाल, टोपी, चांदीची गाय व श्रीफळरुपी वान देऊन व किर्तनकारांचे पूजन करून यथोचित सन्मान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कीर्तनकारांना या अनोख्या वान लावण्याच्या सन्मानाने भारावले . हे एखाद्या मंत्र्याने पहिल्यांदा असा सन्मान केल्याने आम्ही भारावलो असून आमाच्या जीवनात कायम स्मरणात राहील अश्या भावना उपस्थित किर्तनकार यांनी व्यक्त केल्या.
प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने आयोजन केले होते आयोजन !
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व हभप गजाननजी महाराज वरसाडेकर यांच्या संकल्पनेतून ना.गुलाबभाऊ पाटील व मा.प्रतापदादा पाटील यांच्या परिवारातर्फे संतभोजन व संमेलनाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. अधिक महिन्याच्या पावन पर्वात जावई, ब्राह्मण व संत सज्जनांना सन्मानित करुन दान देण्याची परंपरा आहे. अधिक मासाचे औचित्य साधून संत विचार समाजात पोचवणार्या कीर्तनकारांचा यथोचित सन्मान करुन संत सेवा घडावी तसेच मतदार संघातील ज्येष्ठ कीर्तनकारांचा कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा या हेतूने या संतसंमेलनाचे अतिशय देखणे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने आयोजन केले होते.या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
यांची होती प्रमुख उपस्थिती !
याप्रसंगी व्यासपीठावर हभप रूपचंदजी महाराज, शारंगधर महाराज, पांडुरंग महाराज आवारकर, ईश्वरलालजी महाराज पाळधीकर, देवगोपाल शास्त्री महाराज आडगाव,गोविंद महाराज पाचोरेकर यांच्यासह शेकडो किर्तनकार आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी हभप देवगोपाल शास्त्री महाराज, शारंगधर महाराज, रूपचंदजी महाराज, ईश्वरलालजी महाराज, गोविंद महाराज, समाधान महाराज भोजेकर, सूर्यभान महाराज यांची समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली.
भोजनाची अत्यंत शाही व्यवस्था !
याप्रसंगी येणार्या प्रत्येक कीर्तनकारास श्रीफळ,रुमाल, चांदीची गाय अधिकमासाचे वाण म्हणून सप्रेम भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात हभप गजानन महाराज वरसाडेकर यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद करुन सांगितले की, कोणत्याही राजकीय हेतूशिवाय फक्त पारमार्थिक भावनेने ना. भाऊंनी आजपर्यंत विविध मार्गांनी संतसेवा केली आहे. परिसरातील कीर्तनकारांच्या शिफारसीने सर्व गावांना साहित्य दिले जावे अशी मागणी केली. तसेच रूपचंदजी महाराज यांच्या संप्रदायातील योगदानाचा कृतज्ञतापूर्वक निर्देश केला. वयाच्या ७० व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयात एम ए ची पदवी संपादन करणार्या हभप सी एस पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप प्रा. सी एस पाटील यांनी केले. आभार हभप गजाननजी महाराज वरसाडेकर यांनी केले. हभप निवृत्ती महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यसस्वितेसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, धनराज कासट, अरुण पाटील, प्रशांत झंवर, चंदन कळमकर, भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशन व प्रतापराव पाटील मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
भजनी साहित्य देणार !
त्याचाच एक भाग म्हणून मतदार संघातील प्रत्येक गावात उत्तम दर्जाचे भजनी साहित्य टाळ, वीणा, पखवाज, हार्मोनियम इ.वितरीत करण्यात येईल. त्याचेही नियोजन झाले असून मतदारसंघात विभागवार चार- पाच कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
















