चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चारही बाजूंच्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवून देखील प्रशासन ठोस काम करतांना दिसत नाही,म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी दि.९ ऑक्टोंबर रोजी मृतपाय झालेल्या रस्त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या अनोख्या आंदोलनात तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रसचे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी केले आहे.
आज दि.९ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली अकुलखेडा बसस्थानक ते पुढचा पुल अशी रस्त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येणार अजून यावेळी सर्वांनी उपस्थित राहून आपला शोक व्यक्त करीत,माणसाचा मूलभूत हक्क हिरावून घेणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या वतीने करण्यात आले आहे.