धरणगाव(प्रतिनिधी) : शहरातील मरीआईच्या यात्रे निमित्ताने कुस्तीची स्पर्धा रंगली असता कोल्हापूरचा पुथ्वीराज पाटील हा खानदेश केसरी चा मानकरी ठरला असून त्यांनी हरियाणा येथील बंटी खान याचा पराभव केला. यावेळी खान्देश केसरी लढत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. त्यांच्या सोबत कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष भानुदास विसावे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमास नगरसेवक विजू महाजन, राजू महाजन, पप्पू भावे, विलास महाजन, तोसिफ पटेल, प्रशांत देशमुख, रवींद्र कंखरे, वाल्मिक पाटील, बालु जाधव, फारूक पटेल, जितू नारने, भुरा पाटील, अजय चव्हाण, छोटू मौलाना, संतोष महाजन, सद्दाम पटेल, योगेश पाटील, मयूर मोरारकर, किशोर पेहलवान, शकील पटेल, दिलीप महाजन, दिनू धनगर, बुटा पाटील, हेमंत चौधरी. पापा शेठ.विलास माळी. कमलाकर चौधरी.डॉ विलास माळी. रवींद्र माळी उपस्थित होते.