बोदवड (प्रतिनिधी) बोदवड ते नांदगाव रस्तावरील हनुमान मंदिर जवळ ट्रॅक ने एक चाळीस वर्षीय युवकाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ट्रॅक (क्र. एम पी ०७/एच पी ९१६९) चालक हरेंद्रसिंग लाखानसिंग रा. महापुर तालुका जिल्हा भिंड मध्यप्रदेश याच्या विरुद्ध तानाजी मुकुंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ट्रॅक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन काळे करीत आहे.