बोदवड (प्रतिनिधी) गणिताच्या पदवीसोबतच पायथॉन सॉफ्टवेअर ,पावरपॉइंट, एम एस एक्सेल आणि सॉफ्ट स्किल यांची जोड मिळाल्यास आयटी क्षेत्रात करिअर करणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन पुण्याचे आयटी क्षेत्रातील डॉ. देवेंद्र शिरोलकर यांनी केले. बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणित विभागातर्फे आयोजित ‘करियर अपॉर्च्युनिटीज इन आयटी सेक्टर’ या विषयावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
या वेळी त्यांनी गणित विषयाचे विद्यार्थी आयटी क्षेत्रात आपले करिअर कसे घडवू शकतात व त्या साठी त्यांनी काय करावे?, यावर माहिती दिली. गणित विषयात डॉक्टरेट झालेले देवेंद्र शिरोलकर आयटी क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षापासून स्वित्झर्लंडच्या बँकेत सहाय्यक व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत. संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात डॉ. गीता पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. गणित विभागाचे विभागप्रमुख डॉ. रूपेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ.रूपाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर मुक्ता ताठे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.चेतनकुमार शर्मा ,बाबुराव हिवराळे,विजय धोबी,भावना माळी, साक्षी माळी, प्रीती पाटील, वैष्णवी बडगुजर आणि सर्व महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
















