जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात रुग्णांची व शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. याची चौकशी करून शल्यचिकित्सक यांची नुसती बदली किंवा निलंबन न करता त्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी गजानन पुंडलीक मालपुरे यांनी नवी दिल्ली केंद्रीय समितीच्या अध्यक्षांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खालील १) जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना दरम्यान खरेदी करण्यात आलेल्या पि.पी.किट, सॅनिटायझर, बेड यांची खरेदी माझे ज्ञानाप्रमाणे अंदाजीत ६०० रुपयाचा बेड १६०० रुपयाच्या जवळपास तसेच ३०० ते ५०० पि.पी. किट जवळपास १८०० से १९०० रुपयांचे खरेदी केल्याबाबतची माहिती आम्हास ज्ञात आहे. अशा प्रकारे कोरोना कालावधीत जिल्हा रुग्णालयाने केलेल्या खरेदीची संपूर्ण ऑडीट करण्यात यावे.
२) जळगाव जिल्हा रुग्णालयात जे ऑक्सीजन वापरला जातो आहे. त्याची फूड अँण्ड ड्रग्जकडून परवानगी घेतली आहे का? या बाबतची शहनिशा करण्यात यावी. कारण हे ऑक्सीजन सिलेंडर रुग्णांना लागणारे नसल्यामुळेच तर जळगावचा मृत्यू दर वाढला नाही ना? याची सखोल चौकशी करण्यात यावी.
३) जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लहान मुलांचे पोषण आहाराचा निधी कसा खर्च केलेला आहे. याची चौकशी करण्यात यावी. यात यांनी घरचा किराणा भरल्याबाबतची शंका आहे. तरी त्याची चौकशी व्हावी.
४) जळगाव जिल्हा रुग्णालयाचा जेवनाचा ठेका असतांना अनेक रुग्णांनी जेवन नास्ता न मिळाले बाबतचा तक्रारी केलेल्या आहे. तरी रुग्णांना जेवन व नास्ता का मिळाला नाही त्यामुळे किती रुगण दगावले याची शहनिशा करणे गरजेचे आहे.
५) जळगाव जिल्ह्याचे ठिकाण असून अदयावत ऑपरेशन थिएटर चोपडा येथे काढण्यात आले पण तेथे डॉक्टर उपलब्ध आहे का? व तेथे आजतागायत किती ऑपरेशन झालेत याची सुध्दा चौकशी करण्यात यावी.
६) कोरोना कालावधीत यांनी कोरोना नियंत्रणासाठी लागणा-या कोणकोणत्या वस्तु खरेदी केल्या व त्या ग्रामिण रुग्णालयांना किती दिल्या याची देखील शहनिशा करण्यात यावी. वरील सर्व बाबींची चौकशी करून शल्यचिकित्सक यांना तातडीने सेवेतून बळतर्फ करावे, अशी मागणी श्री. मालपुरे यांनी करण्यात आली आहे.