भडगाव (प्रतिनिधी) एका १६ वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून फोनवर व समक्ष धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून विजय पाटील (रा. भडगाव) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी विजय पाटील याने वेळोवेळी पाठलाग केला. तसेच एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून बळजबरीने अत्याचार केला. तसेच बळजबरीने मोटारसायकलवर बसवून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला. तसेच तरुणी ही तिच्या मामांकडे जळगाव येथे गेली असता, तेथेही तरुणीस इशारा करून संशयित पळून गेला. याप्रकरणी संशयित विजय पाटील (रा. भडगाव) याच्याविरुद्ध भडगाव कलम ३७६ (१), ३५४ (ड), ५०६, ५०७ व पोस्को अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहेत.