TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी : जिल्हाधिकारी अमन मित्तल !

जळगावात कृषि दिन उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2023
in कृषी, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केला.

कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्वाधिक योजना या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांसोबत राहील. शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरत उत्पादन वाढ, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण या बाबीवर विशेष जोर दिला पाहिजे. शेती क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत. हे बदल आत्मसात करून शेती अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि शेतकरी यांनी हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवता येतील त्यासाठी शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. गट शेती ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असून कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शेतकऱ्यांनी चौकटीच्या बाहेर विचार केला पाहिजे.

शेतकरी आपल्या शेतात पिकवत असलेला माल प्रक्रिया करून बाजारात पोहोचल्यास शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक हातभार लागू शकतो. यासाठी लवकरच प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी यांची चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केले जाईल, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला. हवामानातील बदल, शेती क्षेत्राशी बदलत्या विविध बाबी शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर घरी बसल्या ही माहिती मिळावी यासाठी मोबाईल वरच सर्व डेटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. यासाठी विविध कंपन्याशी चर्चा देखील सुरू असून लवकरात लवकर हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आपल्या मनोगत म्हणाले की, शहरीकरण कितीही मोठ्या प्रमाणावर झपाट्याने झाले तरी देखील आजही देशाचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. निव्वळ शेतीवरच शेतकऱ्यांनी अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगावर भर देणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस आणि केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही उत्पादनांना प्रक्रिया उद्योगात फार मोठी संधी आहे. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर आणि त्याचे दुष्परिणाम ओळखून रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. मात्र त्याचे दुष्परिणाम देखील फार मोठे आहेत. शेतकरी आणि प्रशासनाने ठरविले तर मदत होऊ शकते असा विश्वास देखील डॉ आशिया यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कापूस संशोधन केंद्राचे कापूस पैदासकार डॉ.गिरीश चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमंत बाहेती यांनी कापूस या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातातील मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी संशोधन केंद्र ममुराबाद यांनी विकसित केलेल्या निंबोळी अर्काचे विमोचन देखील यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत विहिरीच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेशाचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यासोबतच राशी सीड्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात ममुराबाद येथील शेतकरी एन डी पाटील व आसोदा येथील शेतकरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोगतातून शेतकऱ्यांनी शेती करताना येणाऱ्या अडीअडचणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडल्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासनस्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३ ते ९ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठा वाघोदा बु.येथील लोकनियुक्त सरपंच अपात्र

March 12, 2021

कळमडू येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी-माजी सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल !

October 19, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

July 27, 2026

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ. स्मिताताई वाघ यांची नियुक्ती

March 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group