जामनेर (प्रतिनिधी) गाईचा गोठा शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयाची लाच घेताना जामनेर पंचायत समितीच्या लिपिकास आज सकाळी अँन्टी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केली आहे. वसंत पंडीत बारी (वय-५३, कनिष्ठ लिपीक जामनेर पंचायत समिती) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले असुन सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे जामनेर पंचायत समिती कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक वसंत पंडीत बारी (वय ५३) यांनी पंचासमक्ष ३,००० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सदर मागणी केलेली लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक वसंत बारी यांनी आज पंचायत समिती कार्यालय, जामनेर येथे स्वतः बसत असलेल्या कक्षात पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहात अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, PI. संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली आहे.