यावल (प्रतिनिधी) येथील वाणी गल्लीतील रस्त्याच्या कामाचे वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात २८ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना यावल नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला आज रंगेहात अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, वाणी गल्ली, यावल येथील रस्त्याच्या कामाचे वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी (वय-५४) यांनी पंचासमक्ष २८ हजार रुपयांची लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष नगर परीषद, यावल येथे त्यांच्या कार्यालयात लस्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजोग बच्छाव, पोनि निलेश लोधी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ या पथकाने कारवाई केली.